Last Update:
 
क्रीडा

कौंटी क्रिकेटपटू मेनार्डचे अपघाती निधन
-
Monday, June 18, 2012 AT 10:37 PM (IST)
Tags: -
लंडन, ता. 18 ः सरे कौंटी क्‍लबचा क्रिकेटपटू टॉम मेनार्डचे अपघाती निधन झाले. तो 23 वर्षांचा होता. त्याच्या निधनामुळे सरे क्‍लबने बुधवारी होणारी आपली टी 20 लढत खेळण्यास नकार दिला आहे. मात्र, इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना नियोजित वेळेप्रमाणेच होईल, असे स्पष्ट केले आहे.
विंबल्डन पार्कजवळील रेल्वे स्टेशनवर सोमवारी पहाटे त्याचा मृतदेह सापडल्याचे लंडन शहर पोलिसांनी म्हटले आहे. सरे क्‍लबनेदेखील या वृत्तास दुजोरा दिला. विशेष म्हणजे अपघातापूर्वी लंडन पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग करताना त्याला अडविले होते. मर्सिडीज गाडी चालवणाऱ्या त्या व्यक्तीची त्या वेळी ओळख झाली नाही. मात्र, तासाभराने तशाच वर्णनाच्या व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना विंबल्डन पार्क स्टेशनजवळ आढळला. या घटनेची पोलिस अधिक चौकशी करीत असून, नंतर सविस्तर अहवाल देणार आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेला टॉम सरेचा तिसरा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी ग्रॅहम केर्सी (1997) आणि बेन होलिओक (2002) हे सरेचे क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियात झालेल्या कार अपघातात मरण पावले होते.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: