Last Update:
 
क्रीडा

पॉवेलच्या शतकाने विंडीजचे वर्चस्व
-
Monday, June 18, 2012 AT 10:36 PM (IST)
Tags: -
सेंट ल्युसिया, ता. 18 ः सलामीचा फलंदाज किएरॉन पॉवेलच्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीज अ संघाने तिसऱ्या अनधिकृत कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय अ संघावर 90 धावांची आघाडी घेतली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडीजच्या पहिल्या डावात 8 बाद 320 धावा झाल्या होत्या. मॅक्‌लिन 10, तर जॉन्सन 4 धावांवर खेळत होता. पहिल्या डावातील फलंदाजीप्रमाणे भारताची गोलंदाजीदेखील ढेपाळली.
पॉवेलने वर्चस्व राखल्यावर यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन थॉमस यानेदेखील अर्धशतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांना निराश केले. पॉवेलने 255 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांसह 139 धावा केल्या. फलंदाजीत चमकदार कामगिरी करून भारतीय डावास आधार देणाऱ्या जलज सक्‍सेना याने तीन, तर शमी अहमद आणि परविंदर अवाना यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः
भारतीय अ ः सर्वबाद 230, वेस्ट इंडीज अ पहिला डाव ः 8 बाद 320 (किएरॉन पॉवेल 139, डेव्हॉन थॉमस 50, जलज सक्‍सेना 3-55, अवाना 2-78, शमी अहमद 2-62)


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: