Last Update:
 
क्रीडा

रोहन बोपण्णा म्हणतो नो 'पेस'
-
Monday, June 18, 2012 AT 10:34 PM (IST)
नवी दिल्ली - भारतीय टेनिसमध्ये दुहेरीच्या संघावरून सुरु असलेल्या वादात आता आणखी भर पडली आहे. भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा याने आगामी लंडन ऑलिंपिक स्पर्धेत लिअँडर पेसबरोबर खेळण्यास नकार दिला आहे.

अखिल भारतीय टेनिस संघटनेने रविवारी पेस बरोबर खेळण्यास नकार देणाऱ्या महेश भूपतीशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बोपण्णाने आपण पेसबरोबर खेळण्यास तयार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता टेनिस संघटनेला पेसबरोबर खेळण्यासाठी सोमदेव देववर्मन किंवा युकी भांबरी यांच्यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे.

महेश भूपतीने बोपण्णा बरोबर दुहेरीत खेळण्याची तयारी दर्शविल्याने टेनिस संघटनेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने सांगण्यात येत आहे. महेश भूपती
आणि लिअँडर पेस यांनी आतापर्यंत चार ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला असला तरी त्यांना पदक जिंकता आलेले नाही. पेसने १९९६ मध्ये अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत ब्राँझ पदक मिळवून दिले होते.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: