Last Update:
 
क्रीडा

बीच कबड्डीत भारताची आगेकूच
प्रतिनिधी
Thursday, June 21, 2012 AT 12:35 AM (IST)
Tags: -
हेयांग (चीन), ता. 20 ः भारताने येथे सुरू असलेल्या बीच क्रीडा स्पर्धेत कबड्डीत आपली आगेकूच कायम राखली. दुसऱ्या साखळी सामन्यातही भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी सहज विजय मिळविला.
भारताच्या महिला संघाने बांगलादेशाचा 50-28 असा सहज पराभव केला. पूर्वार्धात भारताने तुफानी खेळ करत 27-16 अशी आघाडी घेतली होती. तीच निर्णायक ठरली. पाठोपाठ पुरुष संघाने कोरियाचा 40-25 असा पराभव केला. पूर्वार्धात भारताने 24-10 अशी आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात कोरियाने चांगला प्रतिकार केला. भारताला उत्तरार्धात सोळाच गुण मिळविता आले. तुलनेत कोरियाने पंधरा गुण मिळविले.
आजच्या विजयानंतर भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक कुलदीप यांनी आमचा खेळ चांगला झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, ""कोरियाने उत्तरार्धात खेळ उंचावला होता; पण आम्ही अधिक चांगले खेळलो. आता प्रतिस्पर्धी कोण, यानुसार आम्ही नियोजन आखू.''


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: