Last Update:
 
क्रीडा

लंडन ऑलिंपिकमध्ये भारताचे दोन संघ खेळणार
प्रतिनिधी
Thursday, June 21, 2012 AT 11:44 PM (IST)
नवी दिल्ली - खेळाडूंमधील वादामुळे लंडन ऑलिंपिकमध्ये भारताकडून टेनिसमध्ये दुहेरीत दोन संघ खेळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, अखिल भारतीय टेनिस महासंघटनेचे (एआयटीए) अध्यक्ष अनिल खन्ना यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून महेश भूपती आणि लिअँडर पेस यांच्यातील वादामुळे दुहेरीत नक्की कोण खेळणार याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर यावर आज (गुरुवार) पडदा पडला. टेनिस संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचे दुहेरीत दोन संघ खेळणार आहेत. यामध्ये एका संघात महेश भूपती आणि रोहन बोपण्णा असतील, तर दुसऱ्या संघात लिअँडर पेस आणि विष्णू वर्धन हे दोघेजण असतील. याबरोबरच मिश्र दुहेरीच्या संघात सानिया मिर्झाचा जोडीदार लिअँडर पेस असणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मिश्र दुहेरीत महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेत विजेतेपद मिळविली आहेत. मात्र, ऑलिंपिकसाठी सानियाचा जोडीदार म्हणून पेस निवड करण्यात आल्याने आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे. सोमदेव देववर्मन याने आपण दुहेरीत खेळण्यास तयार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याची निवड न करता विष्णु वर्धनची संघटनेने पेसच्या जोडीला निवड केली आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: