Last Update:
 
देश-विदेश

व्हिसाशिवाय पोर्तुगालला जाणे शक्‍य; लवकरच होणार करार
प्रतिनिधी
Wednesday, March 06, 2013 AT 01:20 AM (IST)
Tags: goa,   gomantak
पणजी, ता. 5 - पोर्तुगालमध्ये व्हिसाशिवाय जाणे-येणे आणि पोर्तुगीज नागरिकाला व्हिसाशिवाय भारतात येणे-जाणे आता लवकरच शक्‍य होणार आहे. केंद्र सरकार व पोर्तुगाल सरकारमध्ये लवकरच तसा करार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापार आणि गुंतवणूक करार मंडळाच्या बैठकीत यावर अलीकडेच चर्चा झाली आहे. केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा आणि पोर्तुगालचे परराष्ट्र व्यवहारमंत्री पावलो पोर्तास यांनी याविषयी थेटपणे चर्चा केली. व्यापार संबंध दृढ करण्यासाठी व्हिसाशिवाय दोन्ही देशांच्या नागरिकांना ये-जा करणे शक्‍य करण्यावर एकमत झाले आहे.
युरोपमध्ये एका देशाने व्हिसा दिला, की तो इतर देशांनाही आपोआप लागू होत असल्याने पोर्तुगालने व्हिसाशिवाय भारतीयांना प्रवेश दिल्यास त्यांना पूर्ण युरोपभर जाता येणार की नाही, या मुद्यावर युरोपीय राष्ट्र समुदायाशी पोर्तुगालला चर्चा करावयाची असल्याने त्याची अंमलबजावणी तूर्त लांबणीवर टाकण्यात आली आहे. मात्र त्यावर तोडगा सापडल्यावर व्हिसाशिवाय पोर्तुगालला जाणे येणे शक्‍य होणार आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: