Last Update:
 
क्रीडा

स्विस बॅडमिंटन स्पर्धेत साईना नेहवालचा पराभव
प्रतिनिधी
Sunday, March 17, 2013 AT 07:59 PM (IST)बॅसल - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिची स्विस ओपन स्पर्धेतील घोडदौड चीनची शिझीयन वँगने रोखली. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिझीयनने साईनचा २१-११, १०-२१, २१-९ असा तीन गेममध्ये पराभव केला.

साईनाला या स्पर्धेत विजेतेपदाच्या हॅटट्रिकची संधी होती. तसेच या स्पर्धेत अग्रमानांकन असलेल्या साईनाने उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित प्रतिस्पर्ध्यावर 29 मिनिटांतच विजय मिळविला होता. त्यामुळे उपांत्य फेरीतही चौथ्या मानांकित चीनच्या शिझीयन वॅंगविरुद्ध तिच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. मात्र, ५० मिनिटे चाललेल्या या सामन्यात साईनाने दुसरा गेम जिंकून सामन्यात आव्हान निर्माण केले होते. पण तिसऱ्या गेममध्ये शिझीयनने जोरदार खेळ करत सहज विजय मिळविला. साईनाने गेल्या आठवड्यात ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत शिझीयनचा पराभव केला होता. याच पराभवाचा बदला शिझीयनने साईनचा पराभव करून घेतला. 


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: