Last Update:
 
देश-विदेश

गोव्यात 1 एप्रिलपासून प्रवेशकर लागू
प्रतिनिधी
Wednesday, March 27, 2013 AT 01:28 AM (IST)
Tags: goa,   gomantak
पणजी, ता. 26 (प्रतिनिधी) ः शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांकडून प्रवेश कर वसूल करणे 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. गोव्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठीचे दरही निश्‍चित करण्यात आले आहेत. प्रवेश करातून दुचाकीधारकांना मात्र वगळण्यात आले आहे.
हा कर गोळा करण्यासाठी 1 एप्रिल रोजी सुरवात व्हावी म्हणून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वसुलीची प्राथमिक तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळाली. गोव्याच्या सीमेवर पुढे 100 व 500 मीटरवर प्रवेश शुल्क स्वीकारणे नाका असल्याचे फलकही झळकले आहेत. त्यामुळे "जिवाचा गोवा' करायला येणाऱ्या वाहनचालकांना प्रवेश शुल्काची तरतूद करूनच मार्गस्थ व्हावे लागणार आहे.
गोव्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गाचा वापर केवळ जी वाहने करतील, त्यांना त्यांचे प्रवेश शुल्क दुसऱ्या सीमेवर चार तासांच्या आत परत केले जाईल. याचाच अर्थ एखाद्या वाहनाने महाराष्ट्राच्या हद्दीतून प्रवेश केला व कर भरला आणि चार तासांच्या आत गोव्यातून बाहेर जाणारे कर्नाटक हद्दीवरील तपासणी नाके गाठले तर तेथे त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

असे असतील प्रवेश कर

तीनचाकी रिक्षा अथवा यांत्रिक वाहन- 100 रू.
चारचाकी हलकी यांत्रिक वाहने- 250 रू.
सहाचाकी वाहने- 500 रु.
सहाचाकांपेक्षा अधिक चाकांची वाहने- 1000 रु.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: