Last Update:
 
देश-विदेश

'कुडनकुलम प्रकल्प पुढील महिन्यात कार्यान्वित'
प्रतिनिधी
Thursday, March 28, 2013 AT 12:01 AM (IST)डर्बन - तमिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील पहिले युनिट पुढील महिन्यापासून कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे, आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना दिले.

पाचव्या 'ब्रिक्‍स' परिषदेदरम्यान पुतीन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर बोलताना मनमोहनसिंग म्हणाले, की एप्रिल महिन्यात कुडनकुलम प्रकल्पातील पहिले युनिट सुरू करण्यात येईल. तिसरे आणि चौथे युनिटही लवकरच कार्यान्वित करण्यात येईल.

या परिषदेत भारत आणि रशियादरम्यान झालेल्या चर्चेवेळी पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, आनंद शर्मा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन हेही उपस्थित होते. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर आले असता या दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला तिरुनेवली जिल्ह्यातील गावकरय़ांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प कोणत्याही स्थितीत कार्यान्वित होऊ नये, यासाठी प्रकल्पाभोवती असलेल्या समुद्राच्या पाण्यामध्ये गावकऱयांनी निदर्शने केली होती. जपानमध्ये आलेल्या त्सुनामीनंतर फुकुशिमा येथील अणुऊर्जा केंद्रात घडलेल्या दुर्घटनेनंतर कुडनकुलम प्रकल्पाला विरोध होत आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: