Last Update:
 
क्रीडा

झेड. पी. चषक स्पर्धेत मुरगाव संघ विजेता
प्रतिनिधी
Monday, April 01, 2013 AT 12:08 AM (IST)
Tags: -
पेडणे, ता. 31 (प्रतिनिधी) ः ध्रुव स्पोटर्स ऍण्ड कल्चरल क्‍लब पार्सेने मुरमुसे तुये मैदानावर आयोजित केलेल्या अखिल गोवा व सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित झेड पी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मुरगांव संघाने यजमान पेडणे संघावर 50 धावानी पराभव करून स्पर्धेतील अजिंक्‍य पद मिळविले. विजेत्या मुरगाव संघाला रोख 50,000 रुपये व झेड. पी. चषक प्राप्त झाला. उपविजेत्या पेडणे संघाला रोख 30,000 रुपये व चषकावर समाधान मानावे लागले. गोवा राज्यातील आठ व सिंधुदुर्ग मधील आठ निमंत्रित संघानी या स्पर्धेत भाग घेतला होता. उपांत्य फेरीत पेडणे संघाने वेंगुर्ला संघाचा तर मार्ग गोवा संघाने कणकवली संघाचा पराभव करून पेडणे व मुरगाव संघ अंतिम सामन्यात पोचले. प्रथम फलंदाजी करून मार्गगोवा ने आठ षटकात चार गडी बाद 94 धावा केल्या. त्यांच्या लल्ला यादवने नाबाद 50 धावा केल्या. त्यात त्याने चार चौकार व दोन षटकार लावले. उत्तरार्धात पेडणे संघाचे 44 धावात सातव्या षटकात सर्व गडी बाद झाले.
अंतिम स्पर्धेतील सामनावीर व मालिकावीर म्हणून लल्ला यादवची निवड झाली. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून योगेश दाभोळकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आकाश देसाई या पेडणे संघातील खेळांडूची निवड झाली.
प्रमुख पाहुणे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती राजेंद्र आर्लेकर , अभिनेता जुल्मी सय्यद, बक्षिसांचे पुरस्कर्ते दत्ता नाईक, तालुका क्रीडा अधिकारी सदानंद सावळ देसाई, माजी कबड्डीपटू देवेंद्र प्रभुदेसाई , गोवा राज्य महिला क्रिकेटच्या कप्तान रेशा राऊळ, संजय नागवेकर, अजय नार्वेकर, दीपक कळंगुटकर, सुजित राणे उपस्थित होते. सुजित राणे यांनी स्वागत केले. चेअरमन दीपक कळंगुटकर यांनी प्रास्ताविक केले. सभापती आर्लेकर व आरोग्यमंत्री पार्सेकर यांनी स्पर्धेचे सहभागी झालेल्या सर्व संघाचे अभिनंदन केले. किशोर नाईक गावकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: