Last Update:
 
क्रीडा

बागानचाही "धेंपो'वर विजय
प्रतिनिधी
Monday, April 01, 2013 AT 12:09 AM (IST)
Tags: -
कल्याणी, ता. 31 ः कोलकत्याच्या मोहन बागाने देखील गतविजेत्या धेंपो स्पोर्टस क्‍लबवर मात केली. रविवारी झालेल्या सामन्यात त्यांनी 2-1 असा विजय मिळविला. या विजयाने बागानला आय-लिग स्पर्धेच्या अव्वल गटातून होणारी संभाव्य गंच्छती टाळण्याच्या मोहिमेला बळ मिळाले.
बागानच्या पंधराव्या फेरीतील सामन्यात सईद रहिम नाबी याने सातव्याच मिनिटाला संघाचे घाते उघडले. सामन्याच्या सुरवातीलाच त्यांनी आघाडी मिळवून प्रस्पिर्ध्यांवर दडपण आणले. अर्थांत, मध्यांतराला त्यांना आघाडी वाढविण्यात अपयश आले. उत्तरार्धात सामन्याच्या 47व्या मिनिटाला ओडाफा ओकोली याने बागानचा दुसरा गोल केला. त्यापूर्वी पूर्वार्धात ओडाफा याने गोल करण्याच्या तीन संधी दवडल्या होत्या. या वेळी मात्र, त्याने संधी सोडली नाही. त्यानंतर चारच मिनिटांना पीटर कार्व्हल्लो याने धेंपोचा एकमात्र गोल केला. त्यापूर्वी सामन्याच्या 26व्या मिनिटाला लांबवरून कार्व्हलो याने जोरदार किक मारून गोल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याची किक गोलपोस्टच्या जवळून बाहेर गेली.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: