Last Update:
 
देश-विदेश

औषध विक्रेत्यांचा शुक्रवारी संप
प्रतिनिधी
Wednesday, May 08, 2013 AT 12:08 AM (IST)
Tags: goa,   gomantak
पणजी, ता. 7 - सरकारी धोरणांमुळे व्यापारावर होत असलेल्या परिणामाच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांनी येत्या 10 मे रोजी संप पुकारला आहे. त्यात गोव्यातील औषध विक्रेतेही सहभागी होणार आहेत. केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन गोवाचे अध्यक्ष लिंडन डिसिल्वा यांनी ही माहिती दिली.
यामुळे येत्या शुक्रवारी औषधे मिळणार नाहीत. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आपल्या नियमित सेवनात असलेली औषधे डॉक्‍टरच्या सल्ल्याने 10 मेपूर्वीच खरेदी करणे गरजेचे बनले आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: