Last Update:
 
देश-विदेश

भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन 25 ते 27 पर्यंत गोव्यात
प्रतिनिधी
Wednesday, May 08, 2013 AT 12:07 AM (IST)
Tags: goa,   gomantak
पणजी, ता. 7 - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन 25 ते 27 मे दरम्यान गोव्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तिसवाडी की सासष्टी तालुक्‍यात हे अधिवेशन होईल हे मात्र ठरायचे आहे अशी माहिती मिळाली आहे. या अधिवेशनात लोकसभेच्या आगामी निवडणुकीविषयी चर्चा होणार असल्याने या अधिवेशनाकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. या अधिवेशनाला भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी 250 नेते येतील असे अपेक्षित धरून तयारी करण्यात येत आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: