Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 6
पणजी, ता. 23 - राज्यात शैक्षणिक पातळीवर पहिलीपासून मराठी किंवा कोकणी विषयाची सक्ती असावी, असा सल्ला राजभाषा सल्लागार समितीने सरकारला आज दिला. त्यासंदर्भात रीतसर प्रस्ताव सरकारला पाठवण्यात येणार असून अंतिम निर्णय सरकार घेईल, अशी माहिती राजभाषा संचालक प्रकाश वजरीकर यांनी आज त्यांच्याशी संपर्क साधला असता दिली. राजभाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री मनोहर यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत राजभाषा कायदा अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. प्रशासनात राजभाषा कायदा लागू व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू झाल्याबद्दल तसेच अर्थसंकल्प कोकणीतून मांडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. अर्थसंकल्पाच्या पहिल्या प्रयत्नांचे स्वागत झाले असून पुढच्या वर्षी संपूर्ण अर्थसंकल्प राजभाषेतून मांडला जाईल, करप्रणालीसंदर्भात तांत्रिक भाषेचा अनुवाद तयार होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मराठी, इंग्रजीतून अर्थसंकल्पाच्या प्रती उपलब्ध होणार आहेत.
Sunday, March 24, 2013 AT 03:00 AM (IST)
पणजी, ता. 23 - गोव्यात शिमगोत्सवाची ओस्सय घुमू लागली असून पणजीच्या शिमगोत्सवाला पर्यटन खात्याने तरंग, लालखी, गुढ्यांची सार्वजनिक जोड देण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी शिमगोत्सव समिती आयोजित चित्ररथ मिरवणूक शनिवारी (ता. 30) होणार असून लावणी लावण्य जल्लोष, लख लख चंदेरी हा महाराष्ट्रातील लोककलेचे दर्शन घडवणारा कार्यक्रम होणार आहे. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांनी ही घोषणा आज येथे पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक, पर्यटन संचालक निखिल देसाई, कोशाध्यक्ष शांताराम नाईक, सचिव संदीप नाईक, सुरेंद्र काकोडकर, शशिकांत सरदेसाई, प्रदीप पालयेकर, किशोर नार्वेकर इत्यादी मंडळी होती. 14 ठिकाणी शिमगोत्सव येत्या 27 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान शिमगोत्सवाचा गोविंदा फोंडा ते काणकोणपर्यंतच्या रस्त्यावर नाचणार आहे.
Sunday, March 24, 2013 AT 01:05 AM (IST)
"एसएनके इव्हेंट्‌स' आणि "तरंगिणी'तर्फे 14 एप्रिल रोजी कला अकादमीत कार्यक्रमाचे आयोजन पणजी, ता. 23 ः सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज... त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही... तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफल नाही... त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत प्रकार नाही... असाच आवाज म्हणजे आशा भोसले यांचा. हा आवाज प्रथमच गोमंतकात गुंजणार आहे. जगभरात मैफली जिंकलेल्या या गोमंतकन्येची गोव्यातील पहिलीच मैफल 14 एप्रिल रोजी होणार आहे. गोमंतकीय रसिकांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती करण्याची ही सुवर्णसंधी हिंदू नववर्षाचे औचित्य साधून एसएनके इव्हेन्टस आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नामुळे साकार होणार आहे.
Sunday, March 24, 2013 AT 01:04 AM (IST)
मुक्त गोव्याचे सुवर्ण महोत्सव साजरे करणारे पहिले मराठी दैनिक असण्याचा मान संपादन करणारा "गोमन्तक' आज एकावन्नावा वर्धापनदिन साजरा करीत आहे. गेल्या अर्धशतकी कालखंडात "गोमन्तक'ने आपली लोकमान्य, लोकप्रिय नाममुद्रा प्रस्थापित केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक आदी सर्वच क्षेत्रांतील विषय "गोमन्तक'ने निष्पक्षपातीपणे आणि आंतरिक तळमळीने हाताळले आहेत. लोकहिताची निश्‍चित भूमिका ठेवून, प्रसंगी शब्दांना कृतीची जोड देऊन लोककल्याणाच्या कळकळीचा पडताळा आणून दिला आहे. "गोमन्तक'ला लोकमानसामध्ये आज अढळ स्थान लाभले आहे, त्याचे हे मर्म आहे. ते जपतच सुवर्णमहोत्सवोत्तर वाटचालही गतिमान केलेली आहे. प्रश्‍न कधी संपत नाहीत. आधीचे प्रश्‍न संपले, मागे पडले तरी त्यांची जागा घ्यायला नवे प्रश्‍न तयार होत असतातच. मागे सुटलेले प्रश्‍न पुन्हा अवतीर्णही होत असतात. प्रत्येक कालखंडाचे म्हणूनही काही प्रश्‍न प्रकट होत असतात. व्यक्तीपासून समष्टीपर्यंत त्यांची व्याप्ती प्रचंड असते आणि स्थूलसूक्ष्म स्तरांवर अनेकविध गुंत्यासह ते उपस्थित होत असतात.
Sunday, March 24, 2013 AT 01:02 AM (IST)
इये गोमंतनगरी नरेंद्र हेमू तारी गेले सहा महिने राज्यातील खाणी बंदच आहेत. सर्वोच्च न्यायालयात असलेला खाण प्रश्‍न आज, उद्या सुटेल अशा भाबड्या आशेत खाण अवलंबित आहेत, पण सगळ्या बाबी तपासूनच मग निर्णय प्रक्रिया सुरू होणार असल्याने यंदाचा खाण "सीझन' हातातून गेल्यातच जमा आहे. गेले दोन महिने फेब्रुवारी न पेक्षा मार्चमध्ये राज्यातील कायदेशीर खाणी सुरू होणार या अपेक्षेत हे लोक होते. राज्यातील निदान कायदेशीर खाणी सुरू व्हाव्यात यासाठी खाणव्याप्त नागरिक आग्रही आहे. त्यासाठी मोर्चा, आंदोलने, धरणे, निवेदने, आवाहने हे सर्व उपाय करण्यात आले. पण या लोकांना अपेक्षित असे काही घडले नाही. सद्यःस्थितीत तरी खाणींचा प्रश्‍न लवकर सुटणार नसल्याची अटकळ खाणव्याप्त भागातील लोकांनी बांधली आहे. त्यामुळे चिंतेची बाब आता वैफल्यग्रस्ततेकडे वळत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी खाणव्याप्त भागातील स्थिती स्फोटक बनत चालल्याचे कबूल केले आहे. त्याचा उद्रेक झाल्यास सबंध गोवा पोळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने त्यासाठी वेळीच आवश्‍यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Friday, March 01, 2013 AT 11:18 PM (IST)
 
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: