Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 500
फोंडा, ता. 21 (प्रतिनिधी) ः आमच्या युतीच्या व मगो पक्षाच्या समर्थक असलेल्या नगराध्यक्ष राधिका नाईक या अनुभवी व कुशल प्रशासक आहेत. त्यांच्यासह सर्व नगरसेवक चांगले सुशिक्षित आहेत. गेले वर्षभर पालिका मंडळ आमच्याकडे नसल्याने विकासकामे करण्याबाबत आम्हाला भरपूर त्रास झाला. आता फोंड्याचा कायापालट करणार, असे आमदार लवू मामलेदार यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. विकासकामांसाठी पालिकेचा ठराव महत्त्वाचा असतो. जनतेच्या सहकार्याने फोंड्यातील पार्किंग, कचराविल्हेवाट, मलनिस्सारण, रस्ते रुंदीकरण, वाहतूक समस्या तसेच रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण करणार व युतीच्या जाहीरनाम्यातील आश्‍वासने पाळणार, असे ते म्हणाले.  मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री यांनीही विकासकामांना लागेल ते सहकार्य देण्याचे आश्‍वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. मगो-भाजप युती अशी... मगो-भाजप युतीच्या सत्तेबाबत पत्रकारांनी वारंवार विचारल्यावर आमदार लवू मामलेदार यांनी सांगितले, की पालिकेच्या 14 जागांपैकी मगोने आठ व भाजपने सहा लढविल्या.
Tuesday, May 21, 2013 AT 11:18 PM (IST)
पणजी, ता. 21 (प्रतिनिधी) ः गोव्यात आधारकार्ड तयार करण्यासाठी बेकायदेशीर व चुकीची प्रक्रिया केली जात असल्याचे निवेदन राज्यपाल भारतवीर वांच्छू यांची भेट घेऊन पिळर्ण सिटिझन फोरमने आज दिले.  2002 साली राज्य सरकारच्या नागरी पुरवठा खात्याने एका परिपत्रकाद्वारे शिधापत्रिका तथा रेशनकार्ड हे ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारू नये, असे परिपत्रक सर्व सरकारी खात्यांसाठी जारी केले होते याची आठवण राज्यपालांना दिलेल्या निवेदनात पिळर्ण सिटिझन फोरमने करून दिली आहे. मात्र त्याच शिधापत्रिकांचा आधार घेऊन आधारकार्डस्‌ बनवली जात आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. 2002 च्या परिपत्रकातून नागरी पुरवठा खात्याने बनावट शिधापत्रिका असल्याचे मान्य केले होते. त्याच बनावट शिधापत्रिका प्रमाण मानून आधारकार्ड तयार करणे म्हणून आधारकार्डातही खोटारडेपणा येणे होय, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणी पिळर्ण सिटिझन फोरमने मुख्य सचिवांचे गेल्या एप्रिल महिन्यात लक्ष वेधले होते परंतु त्यासंदर्भात कारवाई केली जात नसल्याची खंत फोरमने व्यक्त केली आहे.
Tuesday, May 21, 2013 AT 11:17 PM (IST)
पणजी, ता. 21 (प्रतिनिधी) ः पावसाळा नजीक येऊन ठेपला असून एखाद्या नैसर्गिक आपत्तीसाठी नागरिकांना साहाय्य करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी चोवीस तास नियंत्रण कक्ष उभारला आहे. या नियंत्रण कक्षाद्वारे आपत्कालीन वेळेत तत्काळ साहाय्य करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाशी नागरिकांनी संपर्क साधावा म्हणून दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.  उत्तर गोवा जिल्हाधिकारी पणजी दूरध्वनी क्रमांक 2225383, फॅक्‍स 2422059, 2426492, टोल फ्री क्रमांक 1077, मामलेदार बार्देश 2262210, फॅक्‍स 2262233, मामलेदार पेडणे 2201223, मामलेदार डिचोली 2362237, फॅक्‍स 2363886, मामलेदार सत्तरी 2374090, फॅक्‍स 2374243, मामलेदार फोंडा कार्यालय 231212, फॅक्‍स 2319519. पणजी जिल्हाधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक तिसवाडी मामलेदारांचा नियंत्रण कक्षासाठी वापरण्यात येणार आहे. पावसामुळे उत्तर गोव्यात कुठेही धोकादायक स्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती या दूरध्वनी क्रमांकावर दिल्यानंतर आवश्‍यक सहकार्य करण्यात येणार आहे.
Tuesday, May 21, 2013 AT 11:17 PM (IST)
वास्को, ता. 21 (प्रतिनिधी) ः सडा भागात मुरगाव पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असले, तरी धुराचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. आणखी दोन-तीन दिवस तरी रहिवाशांना धुराचा त्रास सहन करण्याची लक्षणे दिसत आहेत. याप्रकरणी प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक व मुरगावचे उपनगराध्यक्ष शेखर खडपकर यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे "अपग्रेडेशन' होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच याप्रकरणी मुरगाव पालिकेच्या सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली.  मुरगाव पालिकेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचराला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. ती आग विझविण्यासाठी विविध अग्निशमन दलांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात आला. तथापि कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या खाली धुमसत असलेली आगीवर नियंत्रण ठेवण्यास त्यांना यश आले नव्हते. पाण्याचा मारा करून काहीच फायदा होणार नसल्याचे जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल यांनी स्पष्ट करून त्या ढिगाऱ्यावर माती टाकण्याची सूचना केली होती. त्यानंतर त्या ढिगाऱ्यावर माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
Tuesday, May 21, 2013 AT 11:16 PM (IST)
पणजी, ता. 20 (प्रतिनिधी) ः गोवा श्रमिक पत्रकार संघटनेच्या (गुज) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज चार पत्रकारांनी उमेदवारी भरल्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या 6 वर पोचली आहे. उद्या (ता. 21) उमेदवारी मागे  घेण्याचा दिवस असून, त्यानंतर निवडणुकीतील उमेदवारीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मागे घेता येणार आहे. कार्यकारिणीसाठी दहा उमेदवारांनी अर्ज आजच्या दिवशी सादर केल्यामुळे एकूण उमेदवारांची संख्या सोळा झाली आहे. दहा कार्यकारिणी सदस्यांसाठी ही निवडणूक आहे. अध्यक्षपदासाठी राजू बी. नाईक, रूपेश सामंत, उमेश बाणस्तरकर यांनी उमेदवारी दाखल केली, तर कैलास नाईक, जेर्राड डिसोझा, केनझिल रॉड्रिग्ज, किशोर शेटमांद्रेकर, काशिराम (प्रसाद) म्हाम्ब्रे, उमेश बाणस्तरकर, सुहासिनी प्रभुगावकर, गणेश शेटकर, ऍशली रोझारिओ यांनी उमेदवारी भरली अशी माहिती निवडणूक अधिकारी बालाजी प्रभुगावकर यांनी दिली.
Monday, May 20, 2013 AT 11:41 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: